संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी दोन दिवसांची डेडलाईन; खड्डा दिसल्यास 'येथे' करा तक्रार!

Swapnil S

मुंबई : मुंबईत पुढील दोन दिवसांत वरुणराजाचे आगमन होणार आहे. पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होऊ नये यासाठी खड्डे बुजवण्यावर पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. पुढील दोन दिवसांत म्हणजे १० जूनपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवत वाहतुकीसाठी रस्ते खुले करा, असे निर्देश दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केल्यास कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत सुरू असलेली रस्त्याची कामे १० जूनपर्यंत ‘सेफ स्टेज’मध्ये आणून रस्ते वाहतूक योग्य करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यापूर्वीच दिले आहे. यानुसार अतिरिक्त आयुक्त भूषण बांगर यांनी शुक्रवारी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्त्याची कामे आणि खड्ड्यांबाबत आढावा घेतला. एखाद्या ठिकाणी खड्डे आढळल्यास ते भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर करता यावी, यादृष्टीने तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

खड्डा दिसला, तर येथे तक्रार करा!

पालिकेच्या अखत्यारितील खड्डेविषयक तक्रार करावयाची असल्यास ती ‘१९१६’ या क्रमांकावर करता येईल. हा क्रमांक २४ तास अव्याहतपणे कार्यरत असतो. मुंबई महानगरपालिकेच्या माय बीएमसी या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटला टॅग करून देखील नागरिक खड्डेविषयक तक्रार नोंदवू शकतात. कोणत्याही खड्ड्याची तक्रार आल्यानंतर २४ तासांत खड्डा बुजवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस