मुंबई

दिल्लीतील व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; मालवणीतील महिलेने उकळले साडेअठरा लाख रुपये

दिल्ली येथील व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून साडेअठरा लाख रुपये उकळल्याच्या आरोपावरून मालवणी पोलिसांनी मीरा उर्फ साहिस्ता आणि कुख्यात गुंड एजाज लकडावाला यांच्याविरोधात ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

मुंबई : दिल्ली येथील व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून साडेअठरा लाख रुपये उकळल्याच्या आरोपावरून मालवणी पोलिसांनी मीरा उर्फ साहिस्ता आणि कुख्यात गुंड एजाज लकडावाला यांच्याविरोधात ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सहकुटुंब दिल्ली येथे राहणाऱ्या या वृद्ध व्यापाऱ्याची तीन वर्षांपूर्वी साहिस्ता हिच्यासोबत ओळख झाली होती. मुंबईत त्यांच्या भेटीगाठी होत असत. त्या कालावधीत साहिस्ताने आपल्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एक जुलै ते पाच सप्टेंबर २०२३ या कालावधीत साडेअठरा लाख रुपये उकळले. त्यानंतरही ती सतत पैशांसाठी ब्लॅकमेल करू लागली. खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर ती एजाज लाकडावाला याच्या नावाने धमकाऊ लागली, असे व्यापाऱ्याने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्राथमिक चौकशीत मालवणी पोलिसांनी साहिस्ता आणि एजाज लकडावाला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यात लकडावाला याचा सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे.

"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला

Mumbai : प्रस्तावित 'रेल्वे टर्मिनस' लटकले; रेल्वे, संरक्षण मंत्रालयात जमिनीचा वाद

Mumbai : आता कोस्टल रोडमध्ये बहुभाषिक फलक

बोगस पॅथॉलॉजिस्टची चौकशी होणार; NABL चा निर्णय