नवाब मलिक,समीर वानखेडे (डावीकडून)  
मुंबई

ॲट्राॅसिटी गुन्ह्याचा तपास स्वतंत्र यंत्रणेद्वारे करण्याची मागणी; वानखेडे यांच्या याचिकेवरून सरकारला नोटीस

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात २०२२ मध्ये दाखल केलेल्या ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्याचा स्वतंत्र यंत्रणेद्वारे तपास करण्याचा आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

Swapnil S

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात २०२२ मध्ये दाखल केलेल्या ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्याचा स्वतंत्र यंत्रणेद्वारे तपास करण्याचा आदेश द्या, अशी मागणी करणाऱ्या केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत याचिकेची सुनावणी १२ डिसेबरला निश्चित केली. केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात २०२२ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. मात्र गेल्या दोन वर्षात गोरेगाव पोलिसांना अनेकदा स्मरणपत्रे देऊनही मलिक यांच्याविरोधातील ॲट्राॅसिटी गुन्ह्यात गंभीर तरतुदीचा समावेश करण्यात आलेला नाही.

मलिक हे राजकीय ताकद, प्रभाव आणि पैशाच्या सामर्थ्यावर पोलीस कारवाईपासून स्वत:चा बचाव करत आहेत आणि विविध माध्यमांना उघडपणे मुलाखती देत आहेत. मलिक यांना कोणताही अंतरिम दिलासा नसतानाही ते मुक्तपणे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत, असा आरोप करून या प्रकरणाचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे अथवा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास