उपमहापौर संजय घाडी 
मुंबई

Mumbai : राणीबागेतील बंगला उपमहापौरांना नाहीच; जलविभागाच्या अखत्यारीतील बंगल्याची आता चाचपणी

मुंबईतील वाढती वाहतूककोंडी, उपनगरातून दक्षिण मुंबईत येण्यासाठी लागणारा वेळ या पार्श्वभूमीवर उपमहापौर संजय घाडी यांनी राणीबागेतील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला मिळावा, यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले होते.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूककोंडी, उपनगरातून दक्षिण मुंबईत येण्यासाठी लागणारा वेळ या पार्श्वभूमीवर उपमहापौर संजय घाडी यांनी राणीबागेतील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला मिळावा, यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले होते. मात्र राणीबागेतील बंगला अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना मंजूर केल्याने आता संजय घाडी यांनी जलविभागाच्या अखत्यारितील बंगला मिळतो का, याची चाचपणी सुरू केली आहे.

उपमहापौर म्हणून दररोज महापालिका मुख्यालयातील बैठका, सभागृहाचे कामकाज, नागरिकांच्या भेटी, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय तसेच प्रशासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक असते. मात्र दहिसरहून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत ये-जा करताना वाहतूक कोंडीमुळे तासनतास वेळ खर्ची पडत असून अनेकदा नियोजित वेळेत पोहोचणेही कठीण होत असल्याचे पत्र घाडी यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शहरात राणीबागेत निवासस्थान उपलब्ध झाल्यास अधिक प्रभावीपणे कामकाज करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान वनस्पती व प्राणीसंग्रहालयात एकूण तीन बंगले आहेत. यापैकी एक बंगला महापौरांसाठी राखीव असून एक बंगला उपसंचालक डॉक्टर यांच्यासाठी राखीव आहे. तर तिसरा बंगला अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे उपमहापौर संजय घाडी यांना राणीबागेतील बंगला मिळण्याची आशा धूसर झाली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण

पहिल्या यादीत केवळ ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; प्राप्तिकर विभागाकडून यादी न मिळाल्याने विलंब

Mumbai : तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

CJP Protest Delhi : कोंडी फुटली, चर्चा सुरू