मुंबई

समृद्धी महामार्गावर जागतिक दर्जाचे शिल्प साकारण्याचा संकल्प

स्वीटी अदिमूलम

अमेरिकेतील जगविख्यात माऊंट रशमोर हे शिल्प ६० फूट उंचीच्या पर्वतावर कोरलेले असून ते लाखो प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. याच माऊंट रशमोर शिल्पापासून प्रेरणा घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने बहुचर्चित समृद्धी महामार्गावर अशाच प्रकारचे शिल्प साकारण्याचा संकल्प केला आहे. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने (एमएसआरडीसी) आंतरराष्ट्रीय शिल्पकाराचा शोध सुरू केला आहे.

सह्याद्री पर्वतरांगांवरील शिल्पांवर अशाच प्रकारचे शिल्प काढता येईल का, याचा मास्टर प्लान तयार करण्यासाठी तसेच प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी एमएसआरडीसीने निविदा काढली आहे. ही संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असून आम्ही या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिल्पकाराचा शोध घेत आहोत, असे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले. एमएसआरडीसीतर्फे ७०० किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून हा महामार्ग सह्याद्री पर्वतरांगांमधील विविध जिल्ह्यांमधून जातो. समृद्धी महामार्गावर अशाप्रकारचे दगडी कोरीव शिल्प साकारण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजते. नाशिक, औरंगाबाद, जुन्नर पट्ट्यात काळे पाषाण आढळतात. त्यामुळे तेथेच प्रस्तावित दगडी कोरीव शिल्प प्रकल्प साकारण्याबाबत तपासणी केली जाईल. अशा प्रकल्पांसाठी अशाप्रकारचे खडक उपयुक्त असतात. औरंगाबादमध्ये अजिंठा-वेरुळ लेणी असून जुन्नरमध्येही पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या अनेक लेणी आहेत. समृद्धी महामार्ग इगतपुरी, औरंगाबाद आणि अन्य ठिकाणच्या पर्वतरांगांमधून जात आहे.

नियोजित योजनेनुसार सर्व काही व्यवस्थित घडून आले तर या खडकांवर महाविकास आघाडी सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प कोरण्यात येणार आहे. या सर्व थोर व्यक्तींनी राज्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

या प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी एमएसआरडीसीने आपल्या वांद्रे येथील कार्यालयात बैठक बोलावली आहे. यासाठी बोली लावण्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होणार असून त्यानंतर लिलावातील तांत्रिक बाजू समजावून घेत प्रत्यक्ष बोली २० जुलैपासून लावता येणार आहे.

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!