Mumbai : घरे विकू नका, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ सदनिकांचे वितरण प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : घरे विकू नका, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ सदनिकांचे वितरण

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा विकास होऊन रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगून येथील रहिवाशांनी आपली घरे विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाडामार्फत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा विकास होऊन रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगून येथील रहिवाशांनी आपली घरे विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाडामार्फत नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे व्यावसायिक बिल्डरच्या भरवशावर अवलंबून न राहता हा प्रकल्प राज्य शासन करेल, असे ठरवण्यात आले. देशातील सर्वोत्तम कंपन्यांना हे काम देऊन हा प्रकल्प उत्तमरीत्या तयार झाला. नायगाव येथील पार्किंगच्या समस्येबाबत मार्ग काढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. पोलिसांच्या घराच्या किमतीच्या प्रश्नांबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून तो सोडवला जाईल, तसेच यासाठी लागणारे समग्र धोरण तयार करावे लागेल, असेही ते म्हणाले. आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याचा दिवस आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. बीडीडीमध्ये राहणारे आता टॉवरमध्ये राहणार. किती तरी वर्षांची त्यांची स्वप्नपूर्ती पूर्ण होत आहे. बीडीडीमधील रहिवाशांचा १२ वर्षांचा मालमत्ता कर म्हाडा भरणार आहे, असेही ते म्हणाले.

घरे म्हणजे केवळ इमारत किंवा सिमेंट-विटांचे बांधकाम नाही, तर ते आपल्या स्वप्नांचे, आशा-आकांक्षांचे प्रतीक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले...

  • २०१६ मध्ये पोलिसांना मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी धोरण आणले आहे, त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच यासाठी कायदेशीर व्यावहारिक मार्ग काढता येईल याकरिता सरकार प्रयत्नशील आहे.

  • मुंबईतील इतर पुनर्विकासाचे काम वेगाने झाले पाहिजे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून २०२९ पर्यंत सर्व घरांच्या चाव्या रहिवांशाना देण्याचे उद्दिष्ट्य आहे.

  • नायगावमधील भवानी माता मंदिराबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी ९०० चौरस फूट जागा दिली जाणार आहे.

माहिती अधिकारातील नव्या नियमांना स्थगिती; कार्यकर्त्यांच्या आक्षेपामुळे सरकारचा निर्णय, फडणवीसांचे माहिती आयोगाला पत्र

शेतकरी महिला विधेयक मंजूर; राज्याबाहेरील शेतमजूर महिलांना शेतकरी दर्जा नाही, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

लंडनमध्ये होणार ‘वैश्विक मराठी भाषा केंद्र’; मुंबईतील मराठी भाषा भवन २०२७ पर्यंत, उदय सामंत यांची माहिती 

ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीला चाप; शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : २.७९ लाख विद्यार्थ्यांची ‘नीट’ फेरपरीक्षेला ‘दांडी’