धावपट्ट्यांचे तत्काळ ऑडिट करा; DGCA चे आदेश 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : धावपट्ट्यांचे तत्काळ ऑडिट करा; DGCA चे आदेश

देशभरातील विनानियंत्रण धावपट्ट्यांच्या (अनकंट्रोल्ड एअरस्ट्रिप्स) घसरत्या सुरक्षा मानकांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या धावपट्ट्यांच्या मालकांना आणि चालकांना कडक निर्देश जारी केले आहेत.

Swapnil S

मुंबई : देशभरातील विनानियंत्रण धावपट्ट्यांच्या (अनकंट्रोल्ड एअरस्ट्रिप्स) घसरत्या सुरक्षा मानकांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या धावपट्ट्यांच्या मालकांना आणि चालकांना कडक निर्देश जारी केले आहेत.

यापूर्वी झालेल्या विमान अपघात आणि गंभीर दुर्घटनांना ही घसरती मानके कारणीभूत ठरल्याचे ‘डीजीसीए’ने नमूद केले आहे. अधिकृत सल्लागार पत्रकात विमान वाहतूक नियामकाने इशारा दिला आहे की, यातील बऱ्याचशा धावपट्ट्या किमान सुरक्षा मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरत असून त्यामुळे विमान उड्डाणांना मोठा धोका निर्माण होत आहे. चालकांनी आपल्या पायाभूत सुविधांचा तत्काळ आढावा घ्यावा, अन्यथा नियामक कारवाईला सामोरे जावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात मोठी वाढ झाली असली, तरी खासगी चार्टर विमाने, प्रशिक्षण संस्था आणि सरकारी उड्डाणांसाठी वारंवार वापरल्या जाणाऱ्या दुर्गम व विनानियंत्रण धावपट्ट्यांच्या देखभालीचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील बारामती येथे झालेला बोंबार्डियर लिअरजेट विमान अपघात हे विनानियंत्रण धावपट्टीवरील मोठ्या दुर्घटनेचे ठळक उदाहरण आहे, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. नियामकाने सर्व कार्यरत सुविधांचे तातडीने आणि सर्वसमावेशक ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

याकडे लक्ष द्या

चालकांनी आपल्या पायाभूत सुविधा वर्षभर सुरक्षित आणि सुगारी राहतील याची खात्री करावी, तसेच नियमित देखभालीसाठी पुरेसा आर्थिक आणि तांत्रिक निधी उपलब्ध करून द्यावा. 'डीजीसीए'ने अनेक गंभीर बाबींची वेळोवेळी तपासणी करण्याचे आणि त्रुटी तत्काळ दूर करण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai : चेहरा पडताळणी प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी; पहिल्याच दिवशी गोंधळ; पत्रकार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूट

Navi Mumbai : सिडकोची तीन रेल्वे स्थानके मध्य रेल्वेकडे; तारघर, खारकोपरसह बामणडोंगरी स्थानकांचा समावेश

Mumbai : व्ही. एन. देसाई रुग्णालयात दोन वर्षे राबला बनावट डॉक्टर; मानवाधिकार आयोगाची महापालिका आणि डीसीपींना नवी नोटीस

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनाला न्यायालयाची स्थगिती

यंदा गणेशमूर्ती २५ टक्के महागणार; कच्चा माल, वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम