मुंबई

शीव पनवेल महामार्गावर अस्वच्छता ;कंत्राटदाराला दोन लाखांचा दंड

अनधिकृतपणे वारंवार राडारोडा टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे

Swapnil S

मुंबई : संपूर्ण स्वच्छ मुंबई अभियान प्रगतीपथावर असताना शीव-पनवेल महामार्गावर, मानखुर्द जंक्शन ते वाशी टोल नाका परिसरात अस्वच्छता निदर्शनास येताच संबंधित कंत्राटदारास दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्यास कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. तर याच भागात अनधिकृतपणे राडाराडा (डेब्रिज) टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी या परिसरात स्वच्छतेच्या अनुषंगाने केलेल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे. दरम्यान, डॉ. शिंदे यांच्या निर्देशानुसार या परिसरात मनुष्यबळ आणि संयंत्र नेमून तत्काळ स्वच्छता करण्यात आली आहे.

स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्‍यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) याप्रमाणे सर्व चोवीस विभागांमध्ये, टप्प्या-टप्प्याने तसेच व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) राबविण्यात येत आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर स्वच्छता अभियान सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर सोमवारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी मानखुर्द परिसरात भेट दिली. यावेळी त्यांना मानखुर्द टी जंक्शन ते वाशी टोल नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. याबाबत डॉ. शिंदे यांनी उप आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि सहायक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाने यांच्या माध्यमातून एम पूर्व विभागाचे सहायक अभियंता यांची सुट्टी त्वरित रद्द करुन परिसर कचरामुक्त करण्याचे आदेश दिले.

मानखुर्द टी जंक्शन परिसरात अनधिकृत वारंवार राडारोडा टाकला जातो. त्यामुळे, अनधिकृतपणे वारंवार राडारोडा टाकणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त  अलका ससाने यांनी दिली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत