मुंबई

खातेवाटपानंतरही नाराजीसत्र कायम; शिंदे गटातील पाच मंत्री नाराज

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर अखेर रविवारी खातेवाटपही जाहीर करण्यात आले. एकीकडे मंत्रिमंडळात समावेश न केल्याने शिंदे गटातील मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच आता खातेवाटपानंतरही हे नाराजीसत्र कायम आहे. या खातेवाटपामुळे शिंदे गटातले पाच मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, केसरकर, राठोड आणि संदीपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे दादा भुसे यांनी खातेवाटपानंतर आपला फोनच बंद केल्याचे समजते. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दादा भुसे यांना बंदरे व खनिकर्म, गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता, दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन तर भुमरे यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन ही खाती देण्यात आली आहेत.

नवे खातेवाटप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार.

राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास

गिरीश महाजन : ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे : बंदरे व खनिकर्म

संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे : कामगार

संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत : उद्योग

प्रा.तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार : कृषी

दीपक केसरकर : शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया