मुंबई

दुमजली वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत

प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा, यासाठी भाडेतत्त्वावरील वातानुकूलित बसेसचा ताफा बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल

प्रतिनिधी

मुंबईकर प्रवाशांच्या गारेगार प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात येत्या डिसेंबरपर्यंत ८०० वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून यात एकमजली, दुमजली, प्रीमियम बसेसचा समावेश असणार आहे. यामुळे बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसच्या तुलनेत भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढणार आहे. बेस्ट उपक्रमाने खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावरील बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण बसताफा सात हजार झाल्यानंतर स्वमालकीच्या बस घेण्यात येतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या बेस्ट उपक्रमाकडे मालकीच्या एक हजार ८३६ बसगाड्या आहेत.

प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार व्हावा, यासाठी भाडेतत्त्वावरील वातानुकूलित बसेसचा ताफा बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होत आहे. वातानुकूलित बसेससह डिजिटल तिकीट प्रणाली अमलात आणली आहे. चलो अॅप व स्मार्ट कार्डवर तिकीट उपलब्ध होत असून, प्रवाशांचाही प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे डिजिटल सेवेचा विस्तार केला जात आहे. तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील बसेस पर्यावरणपूरक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून प्रवाशांचा प्रवास आरामदायी व गारेगार होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

बेस्ट उपक्रमाने डिसेंबर २०२२पर्यंत ८०० वातानुकूलित बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापैकी २०० आरामदायी अशा प्रीमियम बस असून, या बसेसच्या सिट्स मोबाइल अॅपवर आरक्षित करता येणार आहेत.

या सर्व बसगाड्या विजेवर धावणार आहेत. बेस्टच्या वातानुकूलित दुमजली बसची चाचणी सध्या पुण्यात सुरू आहे. चाचणी पूर्ण झाल्यावर ही दुमजली बस प्रत्यक्षात सेवेत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येईल.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण