मुंबई

शहरांनाही लागलेय हुंडाबळींचे ग्रहण...मुंबई, पुणे ठरतेय सामाजिक कुप्रथेचे शहरी रूप

मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरांतील ताज्या आकडेवारीनुसार, हुंड्यासंदर्भात मानसिक आणि शारीरिक छळ, आत्महत्या आणि मृत्यू ही केवळ ग्रामीण भागांपुरती मर्यादित समस्या नसल्याचे ठळकपणे समोर आले आहे. याचे कारण म्हणजे, फक्त मुंबईतच २०२४ मध्ये हुंड्याशी संबंधित छळाच्या ४३८ केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. पुण्यात तर एका राजकीय नेत्याच्या कुटुंबावर सूनेचा छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोप आहे.

Swapnil S

मेघा कुचिक / मुंबई

मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरांतील ताज्या आकडेवारीनुसार, हुंड्यासंदर्भात मानसिक आणि शारीरिक छळ, आत्महत्या आणि मृत्यू ही केवळ ग्रामीण भागांपुरती मर्यादित समस्या नसल्याचे ठळकपणे समोर आले आहे. याचे कारण म्हणजे, फक्त मुंबईतच २०२४ मध्ये हुंड्याशी संबंधित छळाच्या ४३८ केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. पुण्यात तर एका राजकीय नेत्याच्या कुटुंबावर सूनेचा छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोप आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे यांसारखी शहरे या सामाजिक कुप्रथेचे शहरी रूप असल्याचे प्रकर्षणाने जाणवू लागले आहे.

हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याचा उद्देश हुंडा देणे-घेणे या वाईट सामाजिक प्रथेचा अंत करणे हा होता. हुंडा म्हणजे नवरीच्या कुटुंबाकडून नवऱ्याच्या कुटुंबाला दिला जाणारा पैसा किंवा मालमत्ता. हा कायदा अस्तित्वात असतानाही, आजही ही प्रथा समाजात बिनधास्त सुरू आहे - विशेषतः श्रीमंत व उच्चभ्रू वर्गातही.

कार्यकर्त्या व वकील अभा सिंग म्हणाल्या, हुंड्याच्या प्रकरणात वाढ होत आहे कारण तो एक स्टेटस सिम्बॉल (प्रतिष्ठेचं लक्षण) बनला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या लग्नात नवरीला कारची किल्ली दिली गेली. ती नवरीच्या घरून दिली गेली असल्यास, तेव्हा उपस्थित लोक गप्प का होते? आपल्याला आवाज उठवायला हवा होता. मुलांना गाड्या आणि हुंडा देणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याला हुंड्याला नकार द्यावा लागेल.

अभा सिंग म्हणाल्या, यासाठी सोशल मीडिया आणि समाजातील ताण जबाबदार आहे. यामुळे लग्नाचा खर्च वाढला आहे.

गिफ्ट की हक्काचे मागणीपत्र?

हुंडा ही भारतीय समाजातील खोल रुजलेली प्रथा असून, कायद्याने बंदी घालण्यात आली असली तरी दरवर्षी हजारो स्त्रिया या प्रथेमुळे छळ, मारहाण, आणि मृत्यूचा सामना करत आहेत. पूर्वी नवरीला घरच्यांनी दिलेले गिफ्ट ही समजूत असली तरी आज ते एक बळजबरीने मागितले जाणारे "हक्काचे" मागणीपत्र बनले आहे.

लाखो महिलांचा हुंड्यामुळे मृत्यू होतोय, पण शिक्षा फक्त ३०% प्रकरणांमध्येच होते. यावरून स्पष्ट होतं की बहुतांश वेळा नवरा व त्याचे कुटुंब सुटून जाते-कधी पोलिसांची ढिलाई, कधी भ्रष्टाचार, कधी अपुरी माहिती, तर कधी वर्षानुवर्षे चाललेल्या खटल्यांमुळे साक्षीदार फिरतात. - आभा सिंग, कार्यकर्त्या व वकील

हुंड्यासंबंधित आकडेवारी

हुंड्याची प्रकरणे - २०२४: ४३८ प्रकरणे (४१४ तपास पूर्ण)

२०२५ (जानेवारी–एप्रिल) : १६३ प्रकरणे (१३० तपास पूर्ण)

हुंड्यामुळे आत्महत्या

२०२४ : ११ प्रकरणे (९ तपास पूर्ण)

२०२५ (जानेवारी–एप्रिल) : ५ प्रकरणे (५ तपास पूर्ण)

हुंड्यामुळे मृत्यू

२०२४ : ८ प्रकरणे (७ तपास पूर्ण)

२०२५ (जानेवारी–एप्रिल) : १ प्रकरण (१ तपास पूर्ण)

हुंड्यासंबंधित खून

२०२४: १ प्रकरण (तपास पूर्ण)

२०२५ (जानेवारी–एप्रिल) : 0

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video