ड्रोन करणार युद्धभूमीवर तातडीची शस्त्रक्रिया; 'प्रोजेक्ट विमान'; जखमी जवानांवर रिमोटद्वारे उपचार शक्य 
मुंबई

ड्रोन करणार युद्धभूमीवर तातडीची शस्त्रक्रिया; 'प्रोजेक्ट विमान'; जखमी जवानांवर रिमोटद्वारे उपचार शक्य

सध्याचे युग ड्रोनचे आहे. याचा वापर विविध क्षेत्रात होत आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात ड्रोन युग सुरू झाले आहे. युद्धभूमीवर जखमी होणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना आता ड्रोनवर आधारित प्रणालीद्वारे तातडीने उपचार मिळणे शक्य होणार आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई : सध्याचे युग ड्रोनचे आहे. याचा वापर विविध क्षेत्रात होत आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात ड्रोन युग सुरू झाले आहे. युद्धभूमीवर जखमी होणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना आता ड्रोनवर आधारित प्रणालीद्वारे तातडीने उपचार मिळणे शक्य होणार आहे.

एखादा जवान जखमी झाल्यास ड्रोन युद्धभूमीवर पोहोचेल आणि डॉक्टर कमांड सेंटरमधून रिमोटद्वारे शस्त्रक्रिया करतील. यामुळे जवानांचा जीव वाचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. उंच डोंगराळ भाग आणि घनदाट जंगलात कठीण भूप्रदेशामुळे वैद्यकीय मदत पोहोचण्यास उशीर होतो, ज्यामुळे अनेकदा उपचारांमधील महत्त्वाचा 'गोल्डन अवर' वाया जातो. ही दरी सांधण्यासाठी 'एसएस इनोव्हेशन्स इंटरनॅशनल' ने 'प्रोजेक्ट विमान' विकसित केले आहे.

हे तंत्रज्ञान जड मालवाहू स्वायत्त ड्रोनद्वारे तैनात केले जाते. यात सात अंशांपर्यंत हालचाल करू शकणारे दोन सूक्ष्म रोबोटिक हात असून त्याद्वारे अतिशय अचूक शस्त्रक्रिया करता येतात. याद्वारे ट्रॉमा सर्जन रिमोट कमांड सेंटरमधून रक्तस्राव थांबवणे, जखमांची दुरुस्ती करणे आणि शरीरात घुसलेले तुकडे काढणे आदी जीव वाचवणारे उपचार करू शकतात. या प्रणालीचा प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून सध्या नियामक मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.

दिल्लीत पार पडलेल्या तिसऱ्या 'ग्लोबल एसएसआय मल्टी-स्पेशालिटी रोबोटिक सर्जरी कॉन्फरन्स २०२६' मध्ये हे तंत्रज्ञान सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते.

या कंपनीने 'प्रोजेक्ट विमान' सोबतच 'प्रोजेक्ट ओपेरियन' ही फिरती शस्त्रक्रिया कक्ष प्रणाली प्रदर्शित केली. या प्रणालीत रोबोटिक्स तंत्रज्ञान असून ती ३६० अंश कोनातून शस्त्रक्रियेसाठी सोयीची आहे. यामुळे आपत्तीग्रस्त भाग आणि ग्रामीण भागात प्रगत आरोग्य सेवा उपलब्ध होईल. शस्त्रक्रिया कशी आणि कुठे केली जाऊ शकते, याचा आम्ही या तंत्रज्ञानाद्वारे पुनर्विचार करत आहोत, अशी माहिती 'एसएस इनोव्हेशन्स इंटरनॅशनल'चे संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी 'फ्री प्रेस जर्नल'शी बोलताना दिली.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग