दादर येथील प्रमोद महाजन कला पार्कात बहावा बहरला 
मुंबई

Mumbai : बहाव्याच्या बहरानेही दिले पावसाचे शुभसंकेत; दादर येथील प्रमोद महाजन कला पार्कात बहावा बहरला

राज्यात ७ जूनऐवजी यंदा पाऊस लवकर येण्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाने यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी निसर्गात बदलाची चाहूल लागली आहे. मुंबईतील प्रमोद महाजन पार्कसह अनेक ठिकाणी 'बहावा' लवकर फुलला असून पक्ष्यांनीही घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे. ऐन उन्हाळ्यात बहरलेला बहावा मुंबईकरांना लवकर पावसाचे गोड संकेत देत आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात सर्वसाधारणपणे ७ जूनपर्यंत वरुणराजाचे आगमन होते. भारतीय हवामान विभागाने व 'स्कायमेट' या हवामानविषयक संस्थेने यंदा पाऊस अपुरा पडण्याचे अंदाज वर्तवले आहेत. या पार्श्वभूमीवर निसर्गाला पावसाची चाहुल लागल्याचे दिसून येत आहे. पावसाची चाहूल लागली की पक्षी आपली घरटी बनवण्यास सुरुवात करतात. यंदा पक्ष्यांनी आपली घरटी बनवण्यास लवकर प्रारंभ केला आहे, तर ऐन उन्हाळ्यात बहावा फुलल्याने सव्वा महिन्या आधीच पाऊस लवकर पडण्याचे संकेत मिळत आहेत. दादर पश्चिम येथील प्रमोद महाजन कला पार्क येथे बहावा फुलला असून तो नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. मुंबईत अन्यत्रही यंदा बहावा लवकर बहरल्याने उन्हाच्या काहिलीने त्रासलेल्या मुंबईकरांना पाऊस लवकर येणार असल्याचे गोड संकेत मिळत आहेत.

निसर्गचक्रातील होणाऱ्या संभाव्य घडामोडींचे संकेत निसर्गच देत असतो. पूर्वी वेधशाळा, हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या यंत्रणा, संबंधित आधुनिक साधनांचा अभाव असतानाही निसर्गाच्या संकेतावर लक्ष ठेवून शेतकरी व सर्वसामान्य लोक पावसाचा अंदाज बांधत असत.

पाऊस कधी येणार याची चाहूल निसर्गच देत असतो. विविध वृक्षांमध्ये होणारे बदल, पक्ष्यांचे वर्तन यामध्ये कोकिळेचे मंजुळ गायन, कावळ्याने घरटे बांधण्यास सुरुवात करणे, पळस व बहावा फुलणे ही पूर्वापार पाऊस जवळ आल्याची लक्षणे मानली जात होती. वृक्ष हे केवळ सावली देत नाहीत, तर ते निसर्गातील बदलांची चाहूलही देतात. बहावादेखील त्यापैकीच एक असून त्याला 'नेचर इंडिकेटर' असेही संबोधले जाते.

बहाव्याच्या बहरानेही दिले पावसाचे शुभसंकेत; दादर येथील प्रमोद महाजन कला पार्कात बहावा बहरला

दादर पश्चिम येथील प्रमोद महाजन कला पार्कमध्ये विविध प्रजातींची फुले असून यामध्ये सध्या बहरलेला बहावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पिवळ्याधमक फुलांनी न्हाऊन निघालेला बहावा डोळ्यांना आणि पावसाच्या आगमनाचे संकेत देत असल्याने मनालाही सुखद आनंद देत आहे.

बहावा फुलल्यानंतर ४५ दिवसांत येतो पाऊस

पाने झडून आता चैत्राची पालवी फुटू लागली आहे. सावर, पळस आदी वृक्ष पानाफुलांनी बहरू लागले आहेत. मात्र, पिवळ्याधमक फुलांची माळ असलेला बहावा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. बहावा फुलला की पाऊस जवळ आला, असे जुनेजाणते लोक म्हणत असत. बहावा फुलल्यानंतर साधारण ४० ते ४५ दिवसांनी पाऊस पडतोच, असा पूर्वापार संकेत आहे, असे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

Navi Mumbai : पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना; अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंदचे आदेश

'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला गती मिळणार; प्रकल्पांसाठी 'एमआरव्हीसी'ला हवेत ६४,६४४ कोटी