मुंबई

मुंबई-अहमदाबाद Bullet Train मार्गावर 'ही' यंत्रणा; प्रवाशांच्या व प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी निर्णय

Swapnil S

कमल मिश्रा/मुंबई

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्प अधिकाधिक सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे. या मार्गावर २८ ठिकाणी भूकंप सतर्क यंत्रणा बसवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या व प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे.

जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित भूकंप सतर्क यंत्रणा बसवली जाणार आहे. ही यंत्रणा प्राथमिक लहरींद्वारे भूकंपाचे हादरे ओळखेल आणि स्वयंचलितपणे वीज बंद करेल. तसेच वीज बंद झाल्याचे आढळल्यानंतर तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावले जातील. त्यामुळे या भागातील धावणाऱ्या गाड्या थांबतील, असे राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळाच्या माहितीनुसार, या मार्गावर २८ पैकी २२ ठिकाणी रेल्वे मार्गाच्या बाजूला ही यंत्रणा बसवली जाईल. तर आठ भूकंप सतर्क यंत्रणा महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, बोईसर उर्वरित १४ या गुजरातच्या वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, मेहमदाबाद, अहमदाबाद येथे लावल्या जातील. ट्रक्शन सब स्टेशनच्या बाजूला हे सेस्मोमीटर बसवले जातील. त्याचे स्वीच रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असतील.

तसेच सहा सेस्मोमीटर हे खेड, रत्नागिरी, लातूर, पांगरी, अदेसर, जुने भूज येथे लावले जातील. या सर्व भागात गेल्या १०० वर्षात ५.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. हे सर्व्हे जपानी तज्ज्ञांनी केले आहेत. तपशीलवार सर्व्हे व मातीचा अभ्यास केल्यानंतर या साईटची निवड केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रीय जलदगती रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अंजुम परवेझ म्हणाले की, हे सेस्मोमीटर हे नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. प्रवाशांच्या व प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले जात आहे.

मुंबई व अहमदाबाद दरम्यान ३२० किमी प्रति तास वेगाने गाडी चालणार आहे. दोन्ही शहरामधील अंतर ५०८ किमी असून त्यात १२ रेल्वे स्थानक आहेत. सुरत, वडोदरा व अहमदाबाद ही स्थानके घेतल्यास हे अंतर २ तास ७ मिनिटांत पार केले जाईल. तर सर्व स्थानकावर रेल्वे थांबल्यास या प्रवासाला २ तास ५८ मिनिटे लागतील. २०२६ मध्ये सुरत ते बिलीमोरिया दरम्यान प्रायोगिक तत्वावर बुलेट ट्रेन सुरू केली जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती

‘आज जागतिक उच्च रक्तदाब दिन’; ३४ टक्के मुंबईकर ब्लडप्रेशरचे शिकार!

‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा

रोहितचा मुंबई इंडियन्ससाठी आज अखेरचा सामना? लखनऊविरुद्ध हंगामाचा शेवट गोड करण्याचे ध्येय

घाटकोपर बेकायदा होर्डिंग दुर्घटना : एटीसीच्या निवृत्त अधिकाऱ्यासह पत्नीचा दुर्दैवी अंत