मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने गुरुवारी जप्तीची कारवाई केली. प्रफुल्ल पटेलांचे मुंबईतील सीजे हाऊसमधील घर ईडीकडून जप्त करण्यात आले आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेलांवर ही कारवाई केली आहे. यासंबंधी प्रफुल्ल पटेलांची यापूर्वी चौकशीही झाली होती.

मुंबईतील सीजे हाऊसमधील चौथ्या मजल्यावरील प्रफुल्ल पटेलांच्या घरावर ईडीने टाच आणली आहे. वरळीतील सीजे हाऊसमधील दुसऱ्या मजल्यावर आधीच ईडीने कारवाई केली होती. गुरुवारी चौथ्या मजल्यावरील घरावरही कारवाई केली आहे. दुपारी ईडीचे अधिकारी येथे आले व त्यांनी चौथा मजला सील केला.

इक्बाल मिर्ची प्रकरण भोवले

वरळी येथे सीजे हाऊस नावाची मोठी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक छोटीशी इमारत होती. ही इमारत गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. या इमारतीची पुनर्बांधणी प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केली होती. त्या मोबदल्यात प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबियांना काही जागा आणि रोख रक्कम दिली असल्याची माहिती आहे. या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे पटेलांवर मनी लॉन्िड्रंगचा गुन्हा दाखल झाला आहे.

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?