मुंबई

मोठी बातमी! दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई; सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

प्रतिनिधी

दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. यासंदर्भात रामदास कदम यांचे लहान भाऊ सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार असल्याचेदेखील त्यांनी या ट्विटमध्ये सांगितले आहे. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहेत. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदम यांच्या अनिकेत फार्महाऊसवरून ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे सदानंद कदम हे सध्या शिंदे गटात असलेले रामदास कदम यांचे लहान भाऊ आहेत. दरम्यान, साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परब यांच्यावर आरोप केले जात होते. तेव्हा त्यांनी माझा या रिसॉर्टशी संबंध नसून जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला. त्यांनी ही जागा सदानंद कदम यांना दिली असल्याचे स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिले होते. दरम्यान, ही कारवाई सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

T20 World Cup साठी टीम इंडियाची घोषणा: पंत, यशस्वी, चहल, दुबेला संधी; रिंकू, गील राखीव खेळाडूंमध्ये

शिंदे गटाची खेळी; महिन्याभरापूर्वी आलेल्या रवींद्र वायकरांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

नाशिकमधून शिंदेंची वेगळी खेळी! थेट शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी, गोडसेंना धक्का