मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी दक्षिण मुंबईत येणाऱ्या पर्यटक, प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री आठ लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.
मंगळवारी रात्री १.१५ वाजता न चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल रात्री २.५५ वाजता विरार येथे पोहचेल. मध्यरात्री २ वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल रात्री २.४० वाजता विरार येथे पोहचेल.
मध्यरात्री २.३० वाजता चर्चगेट ते विरार लोकल धावेल. ही लोकल पहाटे ४.१० वाजता विरार येथे पोहचेल. रात्री ३.२५ वाजता चर्चगेट ते विरार लोकल चालविण्यात येईल. ही लोकल पहाटे ५.०५ वाजता विरार येथे पोहचेल.
रात्री १२.१५ वाजता विरार ते चर्चगेट दरम्यान लोकल चालविण्यात येईल. ही लोकल मध्यरात्री १.५२ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. तर रात्री १२.४५ वाजता विरार ते चर्चगेट दरम्यान लोकल चालविण्यात येईल. ही लोकल मध्यरात्री २.२२ वाजता चर्चगेट येथे पोहचेल. तसेच रात्री १.४० वाजता विरार ते चर्चगेट लोकल धावेल. ही लोकल रात्री ३.१७ वाजता चर्चगेट येथे पोहचेल.