७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; मुंबई पालिकेतील निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट, माहिती अधिकारातून उघड  (Photo- https://www.mcgm.gov.in/)
मुंबई

Mumbai : ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; BMC तील निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट, माहिती अधिकारातून उघड

मुंबई महापालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या काही उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या २०२६ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या काही उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल ७९ नगरसेवकांच्या निवडीविरोधात कोर्टात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या असून अनेक प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. उपलब्ध माहितीनुसार, एका प्रकरणात लघुतम न्यायालयाने याचिका फेटाळून लावली असून उर्वरित प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती दिली आहे. पालिका निवडणुकीत आव्हान देण्यात आलेल्या निवडणूक याचिकांची सविस्तर माहिती गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेकडे मागवली होती. प्रभाग ११९ ‘एस’मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेना नगरसेवक राजेश सोनावळे यांच्यासह अन्य उमेदवारांविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयाने रद्दबातल केली आहे.

निवडणूक याचिका दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये मोहम्मद रफीक मुस्तफा हुसेन (प्रभाग ९१ एच/पूर्व), आनंद अनिल कोठावडे (१३० एन), ज्योती अनिल उपाध्याय ‘९० एच/पूर्व), चेतन श्रीधर बेलकर (८५ के/पूर्व), मोहम्मद सलीम कुरेशी (९२ एच/पूर्व), प्रतिमा शैलेश खोपडे (१२१ एस), ललिता कचरू यादव (१७५ एफ/उत्तर), एजाज अहमद खान (२११ ई), कृष्णा वासुदेव म्हाडगुट (९१ एच/पूर्व), मनीषा मनोहर पांचाळ (७२ के/उत्तर), जाहिद युनूस खान (१०२ एच/पश्चिम), रंजिता केतन दिवेकर शिवलकर (१७० एल), सारिका मंगेश पवार (१११ एस), विश्वजीत शंकर धोलम (११९ एस, विनोद उदयनारायण मिश्रा (४३ पी/पूर्व), संजीव कुमार कालकोरी (८१ के/पूर्व) व (७६ के/उत्तर), अर्जुन आनंद शिंदे - (१३८ एम/पूर्व), संदीप हनुमंत खारत (११९ एस), फरहीन मोहम्मद जमशेद खान (११९ एस), प्रिया रुपेश पाटील (२२३ बी), विजय ताराचंद लाम्बा (१७६ एफ/उत्तर), विनोद दामोदर घोगडे (११९ एस), मोहम्मद मेहफूज शेख (१३८ एम/पूर्व), राजू श्रीपाद पेडणेकर (६२ के/पश्चिम), समरा फातिमा आरिफ खान (८२ के/पूर्व), स्मिता शंकर म्हात्रे (१७६ एफ/उत्तर), गौरव अरुण राणे (५७ पी/दक्षिण), राजुल सुरेश पटेल (६१ के/पश्चिम), सिद्धार्थ कडाजी उस्तुरे (१४० एम/पूर्व), शैलेंद्र अनंत मोरे (५५ पी/दक्षिण), एकता विनोद चौधरी (८० के/पूर्व), इब्राहिम युसुफ मुल्ला (४ आर/उत्तर), तन्वी दिनेश राव (५० पी/दक्षिण), स्नेहा चंद्रशेखर भाटकर (७६ के/उत्तर), प्रसाद प्रभाकर आयरे (६५ के/पश्चिम), शीतल अशोक म्हात्रे (१ आर/उत्तर), वंदना गौतम साबळे (१५१ एम/पश्चिम), हर्षदा गजानन पाटील (१७६ एफ/उत्तर), जितेंद्र सहदेव राऊत (९९ एच/पश्चिम), प्रिया सावर्णकर गुरव (१९१ जी/उत्तर), पायल संदीप नाईक (८२ के/पूर्व), गौसिया साजेद अकबर शेख (७८ के/उत्तर), संजय बाबुराव अव्हाड (४० पी/पूर्व), भाग्यलक्ष्मी लालसिंग राजपुरोहित (३१ आर/दक्षिण), रुपेश अशोक पाटील (११३ एस), दिनेश अनंत साळवी (२० आर/दक्षिण), करांजे सुवर्णा सहदेव (११७ एस), सुमित कुंडलिक वाजले (९३ एच/पूर्व), सुवर्णा गवस (१२ आर/मध्य), अश्विनी दीपक हांडे (१२८ एन), दीप्ती वायकर पोटनीस (७३ के/उत्तर, राजराजेश्वरी अनिल रेडकर (१२० एस), विनया विष्णू सावंत (३९ पी/पूर्व), विजय सुधाकर महाडिक (३४ पी/उत्तर) आणि रुपल राजेश कुसाळे (१९९ जी/दक्षिण) यांचा समावेश आहे.

तसेच संजय नाना गजानना अंबोले (२०६, एफ/साऊथ), विजय कृष्णा पाटील (१०, आर/सेंट्रल), वृशाली सुरेश हुंडारे (२८, आर/साऊथ), सलमा सलीम अलमेलकर (४८, पी/नॉर्थ), श्रद्धा शरद प्रभू (७१, के/वेस्ट), दीपक रामनिवास फलोद (१४५, एम/ईस्ट), समिधा शिल्पा भोळेकर (२०३, एफ/साऊथ) यांचा समावेश आहे.

आगामी सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

या निवडणूक याचिकांमुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी न्यायालयीन सुनावण्यांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण