मुंबई

गाळ्यासाठी घेतलेल्या १० लाखांचा अपहार ; आरोपीला अटक

आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

प्रतिनिधी

मुंबई : सुमारे १० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी एक महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला दहिसर पोलिसांनी अटक केली. कृष्णा बबन वाळवणकर असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर गाळ्यासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मीरारोड येथे राहणाऱ्या तक्रारदाराला त्याच्या भावाने कृष्णासोबत ओळख करुन दिली होती. या ओळखीदरम्यान कृष्णाने दहिसर येथील मालकीचा गाळा विकायचा आहे, असे सांगितले. गाळ्याची पाहणी केल्यानंतर १५ लाखांमध्ये सौदा झाला होता. त्यापैकी १० लाख रुपये त्याने कृष्णाला दिले तर उर्वरित पाच लाख रुपये गाळ्याचा ताबा मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कृष्णाने त्यांना गाळ्याचा ताबा दिला नाही. अखेर हरिश्‍चंद्र मिश्रा यांनी कृष्णा वाळवणकर याच्याविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत