छतावरील होर्डिंगची सद्दी संपुष्टात 
मुंबई

छतावरील होर्डिंगची सद्दी संपुष्टात, मुंबईत इमारती सुरक्षित ठेवण्यासाठी धोरण; डिजिटल जाहिरातींसाठीही निर्बंध

इमारतीच्या छतावर उभारलेल्या होर्डिंगमुळे इमारती कमकुवत बनत असल्याचे लक्षात आल्याने मुंबईत इमारतीच्या छतावर, गच्चीत नवी होर्डिंग उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही.

Swapnil S

मुंबई : इमारतीच्या छतावर उभारलेल्या होर्डिंगमुळे इमारती कमकुवत बनत असल्याचे लक्षात आल्याने मुंबईत इमारतीच्या छतावर, गच्चीत नवी होर्डिंग उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. सध्या अस्तित्वात असलेली अशी होर्डिंग त्यांना दिलेला कालावधी संपताच काढून टाकली जातील, असे महापालिकेच्या जाहिरात धोरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात आहे.

उच्च न्यायालयात २०१४ मध्ये दाखल झालेल्या याचिकेवर देण्यात आलेले निर्देश याला कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे पालिकेच्या स्तरावर यापुढे छत, गच्चीवरील होर्डिंगसाठी कोणतीही नवी परवानगी दिली जाणार नाही.

छतावर किंवा गच्चीत होर्डिंग उभारताना त्याचे वजन, हवेचा दाब, इमारतीची क्षमता याचा कोणताही विचार करण्यात येत नाही.

शहराचे सागरी हवामान लक्षात घेता गंज आदी प्रक्रियेने इमारती कमकुवत होण्याबरोरच होर्डिंगही धोकादायक बनत जातात, असे निरीक्षण मसुद्यात नोंदवले आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या होर्डिंगचा भाग इमारतीच्या क्षेत्राबाहेर येत असेल, किंवा हे होर्डिंग पुरातत्त्वदृष्ट्या- सौंदयदृष्ट्या महत्त्वाच्या इमारतीवर असेल, किंवा ते मोडकळीस आले असेल तर, या तीन वर्गवारीतील प्रकरणांत सध्याच्या परवानग्या रद्द केल्या जातील. सध्याच्या होर्डिंगवर डिजिटल जाहिराती करण्याआधी त्यासाठी पालिकेच्या संरचनात्मक अभियंत्यांचा अहवाल घेणे बंधनकारक आहे.

असे आहेत नियम

1. दोन होर्डिंगच्या मध्ये किमान ७० मीटरचे अंतर राखले जाईल. बॅक टू बॅक तसेच व्ही आकाराच्या फलकांचा त्यासाठी अपवाद केला जाईल.

2. मुंबईत पूर्व द्रूतगती महामार्ग, पश्चिम द्रूतगती महामार्गावर, तसेच पदपथ, मार्गिका, वाहतूक बेटे येथे होर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही.

3. सक्तीने ठवलेल्या खुल्या जागांवर, जसे की खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने, उद्याने येथे होर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही. अशी जागा सक्तीची नसल्याचे प्रमाणित केल्यास परवानगी मिळेल.

4. वाहन तळ, सार्वजनिक खेळाची मैदाने, वारसा इमारती आदी ठिकाणी होर्डिंगला परवानगी मिळणार नाही.

5. जमिनीपासून १०० मीटर उंचीपेक्षा अधिक होर्डिंगला परवानगी मिळणार नाही.

6. महनीय व्यक्तींच्या पुतळ्यापासून ५० मीटर अंतरात होर्डिंगला परवानगी नसेल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी