मुंबई

अभियंत्याला कंत्राटदारांकडून मारहाण

२४ वॉर्डमध्ये ‘काम बंद’ आंदोलन

प्रतिनिधी

मुंबई : पे अँड पार्कच्या कंत्राटदाराने अभियंता रंजन बागवे यांना मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला होता; मात्र कंत्राटदारावर अद्याप गुन्हा दाखल न केल्याने निषेधार्थ शुक्रवारी पालिकेच्या २४ वॉर्डात दोन तास काम बंद आंदोलन केल्याचे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डी विभागात स्वच्छतेची पहाणी करण्यासाठी २ डिसेंबर रोजी येणार होते. त्या नियोजनासाठी मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे ई विभागातून सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि कामगार यांना घेऊन तुळशीवाडी डी विभागात गेले होते. यावेळी पार्किंगच्या ठिकाणी सहाय्यक अभियंता रंजन बागवे गाडी पार्क करीत असताना रंजन बागवे आणि त्यांचा वाहनचालक यांना पे अँड पार्कचा कंत्राटदार अब्दुल अन्वर शेख यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत रंजन बागवे यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांनी नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलीस संबंधित ठेकेदार अब्दुल अन्वर शेख याच्यावर एफआरआय दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. याच्या निषेधार्थ आणि संबधित कंत्राटदाराला अटक करण्याच्या मागणीही २४ विभागातील अभियंते आणि ई विभागातील सर्व खात्यातील कामगारांच्या वतीने आंदोलन करण्यात आल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले. यावेळी म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख, सरचिटणीस वामन कविस्कर, सहा. सरचिटणीस प्रफुल्लता दळवी, कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, राजेंद्र जोशी उपस्थित होते.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत