मुंबई

पर्यावरण विभागाची एकाच अधिकाऱ्यावर भिस्त: विभागच कामाच्या तणावाखाली; पर्यावरण विभागाचा पालिका प्रशासनाला प्रस्ताव

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली

Swapnil S

गिरीश चित्रे / मुंबई: पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेचा पर्यावरण विभाग महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे; मात्र पालिकेच्या पर्यावरण विभागाची भिस्त एकाच अधिकाऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्याकडे एक क्लार्क असून, अन्य स्टाफ घनकचरा व्यवस्थापन विभागातील आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या पर्यावरण विभागच कामाच्या तणावाखाली असल्याने मुंबई प्रदूषणमुक्त होणार कसा असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, पर्यावरण विभागात मनुष्यबळाची कमतरता असून, किमान प्रत्येक वॉर्डात एक तरी सब इंजिनिअर द्या, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे पर्यावरण विभागाने पाठवला आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बांधकाम ठिकाणी नियमावली जारी केली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे; मात्र पर्यावरण विभागातच मनुष्यबळ कमी असल्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काय करावे? असा प्रश्न आता पर्यावरण विभागाला सतावत आहे. पर्यावरण विभागाला मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

दरम्यान, सफरने मुंबईत ठिकठिकाणी प्रदूषण मापन यंत्र बसवली असून, ती सुरू की त्यात बिघाड हे तपासण्यासाठी पर्यावरण विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. कारण मनुष्यबळ नसल्याने स्टाफ आणायचा कुठून असा सवाल आता पर्यावरण विभागाला सतावत आहे.

पर्यावरण विभागात एकही कर्मचारी नाही

पालिकेत २००५ मध्ये उपायुक्त पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग तयार झाले. तर २०१६ पर्यंत पालिकेचा पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग एकाच उपायुक्ताच्या माध्यमातून काम करीत होते; मात्र २०१६ मध्ये या विभागाचे विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र उपायुक्त नेमण्यात आले; मात्र दोन्ही विभागांच्या अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी पर्यावरण विभागाला एकही कर्मचारी देण्यात आला नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी