मुंबई

बुरखा वाटपाचे शिंदेंच्या शिवसेनेकडून समर्थन!

जाधव यांनी आपल्या भायखळा मतदारसंघातील मुस्लिम महिला मतदारांना बुरख्याचे वाटप केले होते. यावरून भाजपने, आपण अशा कृतींचे समर्थन करीत नाही, अशा शब्दात टीका केली होती.

Swapnil S

मुंबई : मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यावरून भाजपने टीका केली असली तरी शिवसेनेने मात्र या टीकेला किंमत न देता आपल्या कृतीचे जोरदार समर्थन केले आहे. लोकप्रतिनीधींनी मतदारांच्या धर्माचा विचार न करता आपल्या मतदारांना काय हवे आहे याचा विचार केला पाहिजे, असे सांगत आपल्या कृतीचे समर्थन केले.

जाधव यांनी आपल्या भायखळा मतदारसंघातील मुस्लिम महिला मतदारांना बुरख्याचे वाटप केले होते. यावरून भाजपने, आपण अशा कृतींचे समर्थन करीत नाही, अशा शब्दात टीका केली होती. मात्र, जाधव यांनी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळाची आठवण करून दिली. त्यावेळी उध्दव ठाके मुख्यमंत्री असताना कोव्हिड काळात आम्ही गरीब मुस्लिमांच्या घरी रोझे सुरू असताना दोन लिटर दूध पुरविले. त्यावेळी भाजपने आक्षेप का नाही घेतला , असे सवाल करून त्यावेळी ते आमच्यासोबत होते असे जाधव म्हणाल्या.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यामिनी जाधव यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या मतदारसंघात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना मोठी आघाडी मिळाली होती. याचाच धसका घेत आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जाधव यांनी मुस्लिम मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बुरखा वाटपाकडे त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन