मुंबई

माजी नगरसेवकांचे पालिकेत खेटे; स्मशानभूमी, पूल, रखडलेल्या कामांबाबत तक्रारी

मुंबई महापालिकेची निवडणूक तीन वर्षांपासून रखडल्याने लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्याने नागरी कामे प्रलंबित राहत आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तीन वर्षांपासून रखडल्याने लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्याने नागरी कामे प्रलंबित राहत आहेत. रुग्णालये असो की उद्याने की स्मशानभूमी, शाळा असो की पूल असो की रस्ते... लहानसहान बाबींसाठी कामे अपूर्ण असल्याची माजी लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी माजी नगरसेवक सरसावले असून पालिका अधिकाऱ्यांच्या दालनांचे उंबरठे झिजवित आहेत.

महापालिकेत शिवसेनेच्या (शिंदे) सुमारे ७५ माजी नगरसेवकांनी गुरुवारी धाव घेतली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी समस्या मांडण्यासाठी या माजी लोकप्रतिनिधींनी मॅरेथॉन बैठक घेतली. प्रामुख्याने पालिकेच्या सेंट्रल एजन्सी (मध्यवर्ती यंत्रणा) च्या अखत्यारित येणारी स्थानिक कामे रखडल्याचे गा-हाणे त्यांनी प्रशासनापुढे मांडले. त्यात स्मशानभूमी, पूल, आरोग्य केंद्र, उद्याने आदींचा मुद्दा प्रमुख होता. विशेषत स्मशानभूमीची समस्या अनेक ठिकाणी गंभीर असल्याची त्यांची तक्रार होती. त्याच वेळी वॉर्डस्तरावरील यंत्रणा रस्त्यांची कामे ठिकठाक करीत असल्याची समाधानाची पावतीही काही लोकप्रतिनिधींनी दिली. बैठकीला शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.

चिनी, युरोपियन स्मशानभूमी बंद करा

मुंबईत चिनी नागरिक तसेच युरोपीयन नागरिक यांच्यासाठी दोन मोठ्या स्मशानभूमी अस्तित्वात आहेत. पण, त्यांचा फारसा वापर होत नाही. त्यामुळे या जागांच्या वापराचा फेरविचार व्हावा, तेथे अन्य सुविधा पुरवल्या जाव्यात, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव