मुंबई

मान्सून कलाकृतींचे १ ऑगस्टपासून बॉम्बे आर्ट सोसायटीत प्रदर्शन सुरु

या प्रदर्शनात एकूण ६३ चित्र -शिल्पकारांच्या १२० कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत.

प्रतिनिधी

पावसाळा ऋतू सर्वांनाच हवाहवासा वाटतो. चित्रकारांच्या कलेलादेखील पावसाळ्यामुळे एक वेगळाच बहर येतो. पहिल्या पावसातील मुग्ध करणारा मातीचा गंध, मनमोहक हिरवागार निसर्ग, रस्त्यावरील धुसर मिणमिणते दवे, अंधारातही चमकणारे रस्ते, पावसात स्वच्छ न्हावून निघालेली झाडे, आकाशातील इंद्रधनुष्याचा खेळ एकूण पावसाळ्यातील उल्हासदायक वातावरणाचा एकूणएक क्षण आपल्या कॅनव्हासवर चित्रकारांनी टिपले आहेत. याच कलाकृतींचे मान्सून प्रदर्शन येत्या १ ते १० ऑगस्ट २०२२ दरम्यान बॉम्बे आर्ट सोसायटीत सुरु होत आहे. या प्रदर्शनात एकूण ६३ चित्र -शिल्पकारांच्या १२० कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत.

भारतात दृश्यकलेसाठी कुठलेही कलादालन नव्हते. तेव्हापासून बॉम्बे आर्ट सोसायठी कला प्रदर्शने भरवून दृश्यकलेचा प्रचार व प्रसाराचे काम करत आली आहे. या वर्षापासून दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या पावसाळी प्रदर्शनाची भर पडली असून तरुण चित्र-शिल्पकारांना व्यासपीठ मिळावे हा उद्देश सोसायटीचा आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री विजेते मनोज जोशी, सुहास बहुळकर, वरिष्ठ चित्रकार व कला लेखक, प्रा.वीश्वनाथ साबळे, कला संचालक, महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, अभिनेते व चित्रकार यांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कलासंकुलात होणार आहे.

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी

गर्भधारणा रोखणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या गोपनीयतेचे रक्षण करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

मोहित कंबोज यांचा राजकारण संन्यास?