मुदत संपलेल्या औषध विक्रीचा प्रकार उघडकीस; अन्न व औषध प्रशासनाकडे गुन्हा नोंद करण्याची मागणी 
मुंबई

Vasai : मुदत संपलेल्या औषध विक्रीचा प्रकार उघडकीस; अन्न व औषध प्रशासनाकडे गुन्हा नोंद करण्याची मागणी

वसई येथे मुदत संपलेले औषध विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून संबंधित मेडिकल स्टोअरविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Swapnil S

वसई : वसई येथे मुदत संपलेले औषध विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून संबंधित मेडिकल स्टोअरविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

वसई (प.) येथील रहिवासी सौ. अफरीन अशफाक हुसेन (४५) या विधी शिक्षण घेत असून सध्या वसईतील एका विधी कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी दिनांक १७फेब्रुवारी २०२६ रोजी वसई (प.) येथील श्री धन्वंतरी औषधी केंद्र, शॉप क्र. १, हॅपी पॅलेस सोसायटी, दीनदयाल नगर येथून "एरंड भृष्ट हरितकी पावडर" हे औषध खरेदी केले.

सदर औषधाचे उत्पादन दिनांक फेब्रुवारी २०२३ आणि मुदत समाप्ती दिनांक जानेवारी २०२५ असा नमूद आहे. मात्र मुदत संपल्यानंतरही हे औषध विक्रीस ठेवून ग्राहकाला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

औषधाची कमाल किरकोळ किमत (एमआरपी) ८० रुपये होती. हुसेन यांनी औषध सेवन केल्यानंतर त्यांना तीव्र जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने त्यांना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी वसई महानगरपालिका रुग्णालय येथे उपचार घ्यावे लागले. या घटनेमुळे काही काळ त्यांची प्रकृती अस्वस्थ राहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी त्यांनी पालघर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत संबंधित मेडिकल स्टोअरविरुद्ध गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित औषधाचा नमुना जप्त करून अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे आणि दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदविण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी