मुंबई

वर्षभरात साडेसहा लाख उंदरांचा खात्मा; लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेची उंदीर शोधमोहीम

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने योग्य ती खबरदारी घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने योग्य ती खबरदारी घेतली आहे. साथीच्या आजारांमध्ये लेप्टोच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या उंदरावर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. जानेवारी २०२३ ते मे २०२४ पर्यंत तब्बल ६ लाख ७१ हजार ६४८ उंदरांचा खात्मा पालिकेच्या विविध संस्थांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, उंदीर मारण्यासाठी १७ संस्था कार्यरत असून एक उंदीर मारण्यासाठी संस्थेला २३ रुपये मोजण्यात येतात, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. तर साथीच्या आजारांमध्ये लेप्टोचा प्रसार उंदरामुळे होतो. उंदरांचा नायनाट करण्यासाठी विशेष करून रात्रीच्या वेळी कार्यवाही केली जाते. उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्या ठिकाणी विषारी गोळ्या टाकून उंदरांचा नायनाट केला जातो. उंदरांचा प्रजनन-दर, त्यांच्यामुळे संभाव्य रोग प्रसार आणि उंदरांमुळे होणारी नासधूस थांबावी यासाठी ‘मूषक नियंत्रण’ उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. उंदरांपासून होणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर परिसर स्वच्छ राखावा, उंदीर वाढणार नाहीत, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

आकडेवारी

> किती उंदीर मारले- ६,७१,६४८

> किती संस्था कार्यरत - १७

> एका उंदरासाठी मिळणारे रु. - २३

एक वर्षात जोडीपासून १५ हजार उंदीर

सस्तन प्राण्यामध्ये मोडणाऱ्या उंदीर किंवा घुशी यांचे आयुर्मान साधारणपणे १८ महिन्यांचे असते. गर्भधारणेनंतर साधारणपणे २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर आपल्या पिल्लांना जन्म देते. एका वेळेस साधारणपणे ५ ते १४ पिल्लांना ती जन्म देते. जन्म दिलेली पिल्ले ५ आठवड्यात प्रजननक्षम होऊन तीदेखील नव्या पिल्लांना जन्म देतात. यानुसार साधारणपणे एक वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे अंदाजे १५ हजारपर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात.

जखम झालेल्या व्यक्तीला लेप्टोचा धोका!

लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र, माती, पाणी, अन्न, पेयजल आदींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेव्दारे अथवा तोंडाव्दारे लेप्टोस्पायरोसीसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी