मुंबई

अलर्ट! मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ केंद्राचे बनावट संकेतस्थळ; बीकेसी सायबर पोलिसांत तक्रार दाखल

विविध समाजमाध्यमात मुंबई विद्यापीठ आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या नावे बनावट अकाऊंट्स तयार करण्यात आले असून अशा बनावट अकाऊंट्सपासून सावध राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे बनावट संकेतस्थळ आढळून आले आहे. विद्यापीठाने याची गंभीर दखल घेत बीकेसी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विविध समाजमाध्यमात मुंबई विद्यापीठ आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या नावे बनावट अकाऊंट्स तयार करण्यात आले असून अशा बनावट अकाऊंट्सपासून सावध राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या प्रवेशासाठी व इतर अनुषंगिक बाबींसाठी https://mu.ac.in/ distance-open-learning हे अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळासारखे बनावट संकेतस्थळ असल्याचे विद्यपीठाच्या निदर्शनास आले आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेस ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

‘अधिकृत अकाऊंट्सवरील माहिती खरी समजावी’

विविध समाजमाध्यमात मुंबई विद्यापीठ आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या नावे बनावट अकाऊंट्स तयार करण्यात आले असून अशा बनावट अकाऊंट्सपासून सावध राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि मुंबई विद्यापीठ यांचे अधिकृत समाजमाध्यमांचे अकाऊंट असून फक्त अशाच अधिकृत अकाऊंट्सवरून प्रसिद्ध केलेली माहिती खरी समजण्यात यावी, असेही विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल