मुंबई

मराठी महिलेला जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्रांना अखेर अटक

प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर असं या परप्रांतीय पिता-पुत्रांचं नाव आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबईत अनेक सोसाटींमध्ये मांसाहार करतो म्हणून घर नाकारल्याच्या, तसंच मराठी असल्याच्या कारणाने घर नाकारल्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच अजूनही या घटना सातत्याने घटत आहेत. याविषयी दबक्या अवाजात अनेक चर्चा देखील पार पडतात. मात्र कोणतेही ठोस पाऊल उचललं जात नाही. नुकताच मुलुंड वेस्ट येथील एका मराठी महिलेला एका गुजराती व्यक्तीने ऑफिससाठी जाागाा नाकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईसह राज्यभर संतापाची लाट पसरली. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तसंच अनेक राजकीय वक्तींनी याबाबतचं ट्वीट केलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसंच या गुजराती पिता पुत्रांना गाठून त्यांनी चांगलाच इसका दाखवला. यानंतर या व्यक्तींनी या महिलेची माफी देखील मागितली. तसंच यानंतर असा प्रकार घडणार नाही. असं देखील मनसैनिकांनी या पिता-पुत्रांच्या तोंडून वदवून घेतलं. यानंतर आता या पित्रा-पुत्रांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर असं या गुजराती पिता-पुत्रांचं नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांविरोधात भादंसं कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली