मुंबई

'अटल सेतू'वर सेल्फीवरून हाणामारी; तरुणाला २० दिवसांनंतर जामीन

अटल सेतूवर तक्रारदाराचा ग्रुप जोरजोरात ओरडत सेल्फीचा आनंद लुटत होता. यावेळी २० वर्षीय आमीर दानिश व त्याच्या मित्रांनी तक्रारदाराच्या ग्रुपला शांत राहण्यास सांगितले.

Swapnil S

मुंबई : महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या अटल सेतूवर सेल्फी घेण्यावरून दोन गटांमध्ये झालेली हाणामारी आणि लुटमारीच्या घटनेत एका तरूणाला सत्र न्यायालयाने २० दिवसांनंतर दिलासा दिला. सत्र न्यायाधीश राजेश सासणे यांनी आरोपी दानिशला २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचा जामीन मंजूर केला.

अटल सेतूवर तक्रारदाराचा ग्रुप जोरजोरात ओरडत सेल्फीचा आनंद लुटत होता. यावेळी २० वर्षीय आमीर दानिश व त्याच्या मित्रांनी तक्रारदाराच्या ग्रुपला शांत राहण्यास सांगितले. यावरून शाब्दिक बाचाबाची होऊन या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. नंतर आरोपींनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करीत धमकावून मोबाईल व पैसे लुटले. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी १३ फेब्रुवारीला दानिशला अटक केली होती.

अखेर दानिशच्या वतीने ॲड. शब्बीर शोरा यांनी जामीन अर्ज केला होता. दानिश कमी वयाचा तरुण असून, त्याची कोठडीतील चौकशी पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्याला जामिनावर सोडण्याची विनंती ॲड. शोरा यांनी केली. सत्र न्यायाधीश राजेश सासणे यांनी त्यांची विनंती मान्य करून दानिशला २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत