मुंबई

निंबाळकर हत्या प्रकरणाचा आज अंतिम निकाल; दोन दशकांनंतर खटल्याचा फैसला लागणार

काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या २००६ मधील हत्या प्रकरणात तब्बल दोन दशकांनंतर विशेष न्यायालय मंगळवारी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. या खटल्यात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’चे माजी नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ आरोपींचा समावेश आहे.

Swapnil S

मुंबई : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या २००६ मधील हत्या प्रकरणात तब्बल दोन दशकांनंतर विशेष न्यायालय मंगळवारी अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. या खटल्यात ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’चे माजी नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ आरोपींचा समावेश आहे.

अभियोग पक्षाच्या (प्रॉसिक्युशन) दाव्यानुसार, उस्मानाबादमधील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद अब्दुल वाहिद काझी यांची ३ जून २००६ रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यातून या हत्येमागे माजी राज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करत पवनराजे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने २००८ मध्ये हा तपास ‘सीबीआय’कडे सोपवला.

केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, पारसमल जैन, दिनेश तिवारी, महातम चौधरी ऊर्फ पिंटू चौधरी, कैलास यादव, ज्ञानेंद्र पांडे ऊर्फ धीरेंद्र पांडे ऊर्फ छोटे पांडे आणि शशिकांत कुलकर्णी अशा नऊ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस