(संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्यावर एफआयआर

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक केल्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल केला आहे. ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक केल्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल केला आहे. ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद शुजाचा १४ नोव्हेंबरला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो महाराष्ट्र निवडणुकीत वापरण्यात येणारे ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा करत होता. तसेच ५३ कोटी रुपये दिले तर ६३ जागांचे ईव्हीएम हॅक करू, अशी ऑफरही त्याने नेत्यांना दिली होती. माझ्याकडे महाराष्ट्रातील २८८ पैकी २८१ जागांवरील ईव्हीएमचे अॅक्सेस असल्याचे शुजाने म्हटले होते.

महाराष्ट्रातील निवडणुकी दरम्यान सय्यद शुजा याने निवडणूक जिंकण्यासाठी काही नेत्यांशी संपर्क साधला होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा त्याने केला होता. तो अमेरिकेच्या संरक्षण खात्यात कंत्राटावर काम करत असल्याचेही शुजाने सांगितले होते.

२०१९ मध्येही एफआयआर दाखल

सय्यद शुजा याने २१ जानेवारी २०१९ रोजी लंडनमध्ये ‘इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन’च्या पत्रकार परिषदेतही असाच दावा केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या टीमचा तो एक भाग होता. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा वापर करून या मशिन्समध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असे त्याने सांगितले होते.

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Canada News : कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव