मुंबई

एपीएमसी मसाला मार्केटमध्ये आग

मसाला मार्केट मधील एच विंग गाळा २३, कुलस्वामी फूड्समध्ये रविवारी रात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली

नवशक्ती Web Desk

मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये आग लागली आहे. ही आग रविवार रात्री ३ वाजता लागली असून, ११ तास होऊन देखील अद्याप ही आग विझलेली नाही. मसाला मार्केट मधील एच विंग गाळा २३, कुलस्वामी फूड्समध्ये रविवारी रात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. त्याठिकाणी गाळ्याच्या वरच्या भागात काजू, बदाम अक्रोड पिस्ता हा सुकामेवा व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठवण्यात आला होता.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत आहेत. गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्याचा साठ असल्याने आग अधिक भडकून मोठ्या प्रमाणत धूर निघत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी गाळ्यात प्रोसेसिंग सूरु असल्याने आग लागली आहे. आतापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या १३ गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नसून गाळ्यांमधील अनधिकृतपणे साठा करून ठेवण्यात आलेल्या ड्राईफ्रुट्स मुळे ही आग लागली आहे. त्याठिकाणी गाळ्याच्या वरच्या भागात काजू, बदाम अक्रोड पिस्ता हा सुकामेवा व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठवण्यात आला होता.

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू