मुंबई

Video : एलटीटी स्टेशनवरील कँटिनमध्ये लागली आग, अग्निशमनच्या 2 गाड्या घटनास्थळी

एलटीटीच्या व्यस्त प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जन आहार कँटिनमध्ये आग

नवशक्ती Web Desk

कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, आकाशाक धुराचे मोठे काळे ढग दिसत होते.

वृत्तानुसार, एलटीटीच्या व्यस्त प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील जन आहार कँटिनमध्ये दुपारी 3 च्या सुमारास आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी 3.30च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इराणच्या राजधानीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; आणीबाणी जाहीर, भारतीय नागरिकांना दूतावासाचा इशारा

"तो भारदस्त आवाज पुन्हा…"; अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबीयांच्या भावनिक पोस्ट

होळीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवा उद्यापासून सुरू; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा