मुंबई

वरळी येथील इमारतीत अग्नी भडका

१२.४० वाजण्याच्या सुमारास अग्नी भडका उडाला

नवशक्ती Web Desk

मुंबई : वरळी शिवनेरी मार्ग येथील शिवतेज तळ अधिक सात मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत शुक्रवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास अग्नी भडका उडाला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले.

वरळी येथील साई सर्विस, शिवनेरी मार्गावर तळ अधिक सात मजली शिवतेज इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत शुक्रवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर १५ मिनिटांत नियंत्रण मिळवले. दरम्यान, या घटनेत कोणी जखमी झाले नसून, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करीत आहेत.

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप

इंडोनेशियात ६.७ तीव्रतेचा भूकंप; इमारतींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, Video