मुंबई

फर्स्ट क्लास पासधारकांना एसी लोकलमध्ये प्रवास करायला मिळणार

प्रतिनिधी

उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मधल्या काळात एसी लोकलमध्ये फर्स्ट क्लास पासधारकांना लोकलच्या पासने प्रवास करायला मिळावी अशी मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर आता एसी लोकलमध्ये प्रवाशांसाठी फर्स्टक्लास पास अपग्रेड करता येण्याची शक्यता आहे. प्रवासी एसी लोकलचा डिफरन्स भरून प्रवासी पास अपग्रेड करू शकणार आहेत अशी शक्यता आहे. सर्व बुकींग काऊंटर आणि यूटीएसवर ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.

फर्स्टक्लास पासधारकांना एसी लोकलने प्रवास करण्याची इच्छा असूनही लांबलचक रांगांमुळे एसी लोकलच्या तिकीटसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तिकीटांच्या या रांगा कमी कराव्यात किंवा आहे त्या पासमध्ये जास्त पैसे भरून एसी लोकलचा प्रवास करण्यास तयार आहोत, अशी मागणी फर्स्ट क्लास पास धारकांनी मधल्या काळात केली. दरम्यान, या मागणीचा रेल्वे प्रशासनाकडून विचार केला जात असून फर्स्ट क्लास पासधारकांना एसी लोकलचे स्वतंत्र तिकीट काढण्याऐवजी त्यांच्याकडे असलेल्या पासने प्रवास करण्याची परवानगी प्रवाशांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार