संग्रहित छायाचित्र  
मुंबई

खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे; रस्‍त्‍यावरील १० हजार विक्रेत्यांना प्रशिक्षण

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, विक्रीच्या ठिकाणची स्‍वच्‍छता आणि सज्जता, अन्न शिजवणे किंवा पाककृती करणे, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची माहिती सोबतच प्रभावी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Swapnil S

मुंबई : सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील जोखीम कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांना दूषित, अनारोग्य अन्न सेवनापासून परावृत्त करण्यासाठी पालिका हद्दीतील १० हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. या अंतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, विक्रीच्या ठिकाणची स्‍वच्‍छता आणि सज्जता, अन्न शिजवणे किंवा पाककृती करणे, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची माहिती सोबतच प्रभावी प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

रस्त्यावरील खाद्य पदार्थ आणि मुंबईकरांचे अतूट नाते आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्यासाठी खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याकामी पालिका सर्वतोपरी सहकार्य करेल. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना स्वच्छ, ताजे अन्‍न पुरवावे यासाठी परवानाधारक खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

संयुक्त समन्वय समिती स्थापन

सामंजस्य करारानुसार, विविध उपक्रम राबवण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांची संयुक्त समन्वय समिती स्थापन केली जाईल. त्यात महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे प्रत्येकी तीन सदस्य असतील.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव