Twitter
मुंबई

मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विदेशी महिलेस अटक

बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यांना वीस कॅप्सुलमधून ३५० ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले.

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिलेस हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. व्हिक्टोरिया ओकाफोर असे या महिलेचे नाव असून, तिच्याकडून या अधिकाऱ्यांनी सव्वाकोटीचे ३५० ग्रॅम वजनाचे हेरॉईन ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर तिला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीला जाणाऱ्या विमानातून काहीजण ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने दिल्लीला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची झडतीसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरू केली होती. याच दरम्यान व्हिक्टोरिया ओकाफोर या नायजेरीयन महिलेस या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यांना वीस कॅप्सुलमधून ३५० ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप