मुंबई

मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा विस्फोट

बुधवारी रुग्णसंख्येत ५००ने वाढ होत तब्बल १,७६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे

प्रतिनिधी

मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाला असून, रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल १,७६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ८३ कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ११ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत असून, मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा गुणाकार सुरू झाला आहे. दरम्यान, कोरोनाची चौथी लाट रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने केले आहे.

मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा विस्फोट झाला असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी १,२४२ रुग्णांची नोंद झाली होती. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी रुग्णसंख्येत ५००ने वाढ होत तब्बल १,७६५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ७३ हजार ५४१ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात ७३९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ४६ हजार ९७२ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सात हजार सक्रिय रुग्ण आहेत.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

Ganeshotsav 2026 : गणपती दर्शनाला ठाण्यात जाताय? 'या' मंडळांना नक्की भेट द्या

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण