मुंबई

तोतया आर्मी अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

आर्मीच्या गाड्याच्या दुरुस्तीसाठी या मशिनररीचा वापर होणार होता

नवशक्ती Web Desk

मुंबई : अंधेरीतील एका व्यावसायिकाची आर्मी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या एका अज्ञात सायबर ठगाने सुमारे अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या तोतयाविरुद्ध जुहू पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा जुहू पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरू आहे. अंधेरी येथे राहणार्‍या तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचा विदेशातून मशिनरी आयात करण्याचा व्यवसाय आहे. मे महिन्यांत ते त्यांच्या घरी होती. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्याने त्याचे नाव कुलदीप शर्मा असल्याचे तो आर्मीमध्ये लेफ्टनंट म्हणून काम करतो. सध्या तो कुलाबा आर्मी स्कूलमध्ये कामाला आहे. त्याने त्यांच्याकडे काही मशिनरीची मागणी केली होती. आर्मीच्या गाड्याच्या दुरुस्तीसाठी या मशिनररीचा वापर होणार होता. मशिनरीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, त्यापूर्वी त्यांना आर्मीचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशनसाठी त्यांना ४८ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ही रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.

इराणच्या राजधानीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; आणीबाणी जाहीर, भारतीय नागरिकांना दूतावासाचा इशारा

"तो भारदस्त आवाज पुन्हा…"; अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबीयांच्या भावनिक पोस्ट

होळीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवा उद्यापासून सुरू; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा