मुंबई

टास्कद्वारे चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची फसवणुक

प्रतिनिधी

मुंबई - टास्कद्वारे चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका ५५ वर्षांच्या डॉक्टरची अज्ञात सायबर ठगाने सुमारे पावणेपाच लाखांची फसवणुक केल्याची घटना सातरस्ता सर्कल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगांचा शोध सुरु केला आहे. तक्रारदार व्यवसायाने डॉक्टर असून ते खाजगी प्रक्ट्रीस करतात. त्यांची पत्नीदेखील डॉक्टर असून ती रिलायन्स रुग्णालयात संचालिका म्हणून काम करते. काही दिसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करुन विविध टास्कद्वारे चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. घरबसल्या चांगले पैसे मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता. त्यानंतर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. तिथे त्यांना विविध टास्क देण्यात आले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्यात खात्यात कमिशनची रक्कम जमा झाली होती. त्यामुळे त्यांना विश्‍वास बसला होता. त्यानंतर त्यांना विविध टास्कसाठी गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या गुंतवणुकीवर त्यांना जास्त परतावा मिळेल असे सांगण्यात आले. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी २५ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत टास्कसाठी सुमारे पावणेपाच लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र त्यांना कमिशनची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांना मूळ रक्कमेसह कमिशनची रक्कम न देता या सायबर ठगांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आग्रीपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस