PM
मुंबई

केवायसी अपडेटसाठी लिंक पाठवून वयोवृद्ध महिलेची फसवणूक

पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच तिने हा प्रकार जुहू पोलिसांना सांगितला.

Swapnil S

मुंबई : केवायसी अपडेटसाठी मोबाईलवर लिंक पाठवून एका वयोवृद्ध महिलेची तीन लाख साठ हजाराची फसवणूक झाल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून जुहू पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ७७ वर्षांची तक्रारदार वयोवृद्ध महिला विलेपार्ले येथे राहत असून, ती एलआयसी एजंट म्हणून काम करते. तिच्या भावाचा सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले असून, त्याच्या बँक खात्याचे सर्व व्यवहार तीच सांभाळते. सोमवारी २५ डिसेंबरला तिला अमीत खन्ना नावाच्या एका व्यक्तीने फोन करून तो तिच्या नवी मुंबईतील बेलापूर येथील बँकेतून बोलत आहे. तिच्या भावाचे केवायसी अपडेट झाले नाही. त्यामुळे तातडीने केवायसी अपडेट करा नाहीतर त्यांचे खाते बंद होईल असे सांगितले. त्याने तिला एक लिंक पाठवून या लिंकमध्ये केवायसी अपडेट करण्यास सांगितले. त्यामुळे तिने ती लिंक ओपन केली होती. ही लिंक ओपन करताच तिच्या मोबाईलवर काही ओटीपी क्रमांक आले होते. ते ओटीपी क्रमांक त्याला शेअर केल्यानंतर बँक खात्यातून तीन लाख साठ हजार रुपये डेबीट झाले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच तिने हा प्रकार जुहू पोलिसांना सांगितला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक