मुंबई

पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने महिलेसह दोघांची फसवणुक

याप्रकरणी मालाड व साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास सुरु केला आहे.

प्रतिनिधी

मुंबई : पार्टटाईम नोकरी देण्याची बतावणी करुन घरबसल्या जास्त कमिशनचे आमिष दाखवून एका महिलेसह दोघांची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. जास्त कमिशनच्या मोहापायी या दोघांनी त्यांच्या बँक खात्यातून ७ लाख ६८ हजार रुपये ट्रान्स्फर केले, मात्र मुद्दलसह कमिशनची रक्कम न देता या ठगांनी या दोघांची फसवणुक केली होती. याप्रकरणी मालाड व साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास सुरु केला आहे.

एका खाजगी कंपनीत कामाला असलेला तक्रारदार तरुण त्याच्या कुटुंबियांसोबत साकिनाका येथे राहतो. गेल्या आठवड्यात त्याला पार्टटाईम जॉबसंदर्भात एक मॅसेज प्राप्त झाला होता. हॉटेलच्या लिंकवर शेअर केल्यास प्रत्येक शेअरमागे त्याला दिडशे रुपयांच्या कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याने होकार दिल्यानंतर त्याला काही लिंक पाठवून शेअर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. सुरुवातीला त्याला कमिशनची रक्कम मिळाली, त्यामुळे त्याचा त्याच्यावर विश्‍वास बसला होता. त्यानंतर त्याला जास्त कमिशनचे प्रलोभन दाखवून विविध टास्कसाठी काही रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.

या आमिषाला बळी पडून त्याने टास्कसाठी ३ लाख ५३ हजाराची गुंतवणुक केली होती. मात्र त्याला कमिशनची रक्कम मिळाली नाही. विचारणा केल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्याला आणखीन काही टास्क पूर्ण करण्यास सांगून तोपर्यंत कमिशनची रक्कम मिळणार नाही असे सांगितले. ऑनलाईन बँकिंग माध्यमातून त्याची आर्थिक फसवणुक झाल्याचे उघडकीस येताच त्याने साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगांविरुद्ध तक्रार केली होती.

दुसर्‍या घटनेत एका महिलेची अशाच प्रकारे अज्ञात सायबर ठगाने ४ लाख १६ हजाराची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मालाड व साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू