मुंबई : 'द फ्री प्रेस जर्नल' आणि 'चिल्ड्रन्स टॉय फाऊंडेशन' यांच्यावतीने चिल्ड्रन्स टॉई फाऊंडेशनच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त फ्री प्रेस हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'आंतरशालेय माइंड अँड फन गेम' स्पर्धेतील विविध खेळांचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर आनंद घेतला. मुलांना मनोरंजक आणि बौद्धिक खेळांच्या माध्यमातून रणनीती, गणित, स्मरणशक्ती, शब्दसंपदा, तार्किक विचार आणि निर्णयक्षमता या कौशल्यांचा विकास प्रेरित करण्यात आले. मुलांमधील विविध कलागुणांसह बौद्धिक विकास होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेत सहावीचे एकूण ४८ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये ६ पालिका शाळांमधील २४ विद्यार्थी आणि ६ खासगी शाळांमधील २४ विद्यार्थ्यांचा समावेश होता. ऐरोली, खारघर, मुलुंड, मालाड तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. दरम्यान, कार्यक्रमासाठी जागा आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सीटीफएच्या सुचेता संघवी यांनी आभार मानले.
स्पर्धेतील विजेते
प्रथम क्रमांक : गेम मास्टर ट्रॉफी
जिवा जाधव : शेठ करमशी कांजी इंग्लिश स्कूल, मुलुंड
उपविजेता ट्रॉफी विवान जैन : एचव्हीबी ग्लोबल अकॅडमी, चर्चगेट
तृतीय क्रमांक : अभिषेक चौरसिया : गिल्डर लेन मुंबई पब्लिक स्कूल, ग्रँड रोड
ऑक्टिव्ह फन गेम : '१ ते ५ टाळीचा खेळ'अर्हम शाह : शेठ जुग्गीलाल पोद्दार अकॅडमी, मालाड
स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा
१. बंट्स संघाच्या एस. एम. शेट्टी हायस्कूल, पवई, २. एचव्हीबी ग्लोबल अकॅडमी, चर्चगेट, ३. डीएव्ही पब्लिक स्कूल, ऐरोली, ४. द बाई बी. एस. बंगाली गर्ल्स हायस्कूल, चर्चगेट, ५. बी. के. एम. हायस्कूल, ग्रँट रोड, ६. एस. टी. मेहता इंग्लिश सेकंडरी स्कूल, घाटकोपर, ७. गिल्डर लेन मुंबई पब्लिक स्कूल, ग्रँट रोड, ८. शेठ करमशी कांजी इंग्लिश स्कूल, मुलुंड, ९. रायन इंटरनॅशनल स्कूल, खारघर, १०. शेठ जुग्गीलाल पोद्दार अकॅडमी (आयसीएसई), मालाड
मुलाला आनंदाची संधी मिळायला हवी
चिल्ड्रन्स टॉय फाऊंडेशनचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त देवेंद्र देसाई यांनी उपस्थितांना सीटीएफच्या कार्याची माहिती दिली. खेळाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला सर्जनशीलता, बौद्धिक विकास आणि आनंदाची संधी मिळायला हवी, या फाऊंडेशनच्या विचारावर त्यांनी प्रकाश टाकला. सीटीएफकडे सध्या ४८५ पेक्षा अधिक खेळणी पुस्तकालये आणि ४ फिरत्या खेळण्यांच्या व्हॅन्सचे जाळे असून या उपक्रमांच्या माध्यमातून ४० हजारांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग
विद्यार्थ्यांसोबत आलेले शिक्षक केव प्रेक्षक न राहता स्पर्धेचा सक्रिय भान बनावेत, या उद्देशाने सीटीएफतर्फे 'टीचर्स सोल्व्ह इट' या विशेष बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडविण्याच्या कौशल्यार्च चुणूक दाखवली.
विजेते शिक्षक
प्रथम क्रमांक : फाल्गुनी मॅडम, एचव्हीबी ग्लोबल अकॅडमी
द्वितीय क्रमांक : जयश्री मॅडम, गिल्डर लेन मुंबई पब्लिक स्कूल