मुंबई

अंधेरी गॅस पाईपलाइन दुर्घटनेतील एका जखमीचा मृत्यू

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास महानगर गॅस पाईपलाइनच्या गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेतील तीन जखमींपैकी एका जखमीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास महानगर गॅस पाईपलाइनच्या गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेतील तीन जखमींपैकी एका जखमीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमन हरिशंकर सरोज असे मृत तरुणाचे नाव असून तो अवघा २२ वर्षांचा होता, तर २१ वर्षीय अरविंदकुमार कैथल या जखमी तरुणाची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीतील गुरुद्वारासमोर असलेल्या रस्त्यातून जाणारी महानगर गॅस कंपनीची पीएनजी पाईपलाइनमध्ये शनिवारी रात्री सुमारे ११.३० च्या सुमारास गळती सुरू झाली. पाईपलाइनला गळती सुरू झाल्यानंतर शॉर्टसर्किट होऊन त्या परिसरात मोठी आग लागली. या आगीत रस्त्यावर असलेला रिक्षाचालक आणि दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी अमन सरोज हा दुचाकीस्वार ५० टक्के भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा सोमवारी मृत्यू झाला. अमनच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसल्याची माहिती रुग्णालयातील एका व्यक्तीने दिली.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर