मुंबई

गौरी गर्जे प्रकरणात मोठा ट्विस्ट; दोघांच्या अंगावर जखमा, अनंत गर्जेच्या पोलिस कोठडीत वाढ

गौरी गर्जे प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये मोठा ट्विस्ट समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीच्या आधारे अनंत गर्जे याची कसून चौकशी करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

नेहा जाधव - तांबे

मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जेच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी वरळी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. केईएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असणाऱ्या गौरी हिने आत्महत्या केली नसून ही हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. हे प्रकरण गंभीर बनताच मुंबई पोलिसांनी अनंत गर्जे याला ताब्यात घेतले. आता या प्रकरणी गुरुवारी (दि. २७) कोर्टात झालेल्या सुनावणीत मोठी घडामोड घडली आहे. न्यायालयाने अनंत गर्जेची पोलीस कोठडी वाढवत २ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.

गौरी आणि अनंतच्या अंगावर जखमा

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी कोर्टासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात गौरी आणि अनंत दोघांच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत आणि त्या कशा आल्या याचा तपास आवश्यक असल्याचे म्हंटले. मोबाईलमध्ये काही रेकॉर्डिंग सापडले असून त्यांचा सखोल तपास बाकी आहे. घरातील सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि जखमांच्या तपशीलांचा संबंध लावण्याची गरज असल्याने १० दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

अनंतच्या शरीरावर जखमा जुन्या

यावर अनंत गर्जेचे वकील मंगेश देशमुख यांनी सरकारी दाव्यांना विरोध करत म्हटले रिमांड रिपोर्टमध्ये गौरीच्या शरीरावर जखमा आहेत असे स्पष्टपणे कुठेच नमूद केलेले नाही. अनंतच्या शरीरावर आढळलेल्या २८ जखमा जुन्या आहेत आणि या प्रकरणाशी संबंधित नाहीत. अनंत गर्जे तपासात पूर्ण सहकार्य करत असून, घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी स्वत: तो पोलिसांसमोर हजर झाल्याचा दावा त्यांनी केला. दोन्ही मोबाईल फोन पोलिसांकडे जमा केले असून, कॉल रेकॉर्डिंग तपासासाठी उपलब्ध केले आहेत.

दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. पोलिसांनी काही महत्त्वाचे डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे हाती घेतले असून, पुढील चौकशीत नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

६ महिन्यांचा संसार, कौमार्य चाचणी अन् पतीचे अफेअर; नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं जीवन

Disha Salian's Death Case : पाच वर्ष उलटले तरी किती वेळ चौकशी करणार? हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

कोकणात राणे बंधू वाद टोकाला; निलेश राणेंच्या स्टींग ऑपरेशनवर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "हमाम में तो सब...

मुंबई, पुण्यासाठी खूशखबर! बदलापूर ते कर्जत तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला मंजुरी; पुणे मेट्रोच्या 'फेज २'चा विस्तार होणार

पाकिस्तानी मौलवीचं वादग्रस्त वक्तव्य; ...तर ऐश्वर्या रायसोबत लग्न करणार, नाव ठेवणार आयेशा