मुंबई

मुदत संपलेल्या वस्तूंची विक्री पडली महागात; घाटकोपर येथील कंपनीविरोधात गुन्हा दाखल

एक्सपायरी अथवा एक्सपायरी तारीख जवळ आलेला माल डी मार्टमधून खरेदी करत तो पुन्हा रिपॅकिंग करत बाजारात विक्री केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने घाटकोपर येथील खुशी ट्रेडिंग कंपनीत छापा टाकला असता तपासणीत हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : एक्सपायरी अथवा एक्सपायरी तारीख जवळ आलेला माल डी मार्टमधून खरेदी करत तो पुन्हा रिपॅकिंग करत बाजारात विक्री केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने घाटकोपर येथील खुशी ट्रेडिंग कंपनीत छापा टाकला असता तपासणीत हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे व संयुक्त आयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन, ग्रेटर मुंबई झोन - ८ यांनी २२ मे २०२५ रोजी घाटकोपर (पश्चिम) कोजमांजिंजी इस्टेट येथील एम एस खुशी ट्रेडिंग गाळा क्र. बी १९, बी २१ व बी २२ येथे छापा टाकला. यावेळी तपासणीदरम्यान आस्थापनाकडे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा वैध परवाना नसल्याचे आढळून आले. ते अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३१(१) चे स्पष्ट उल्लंघन आहे. उत्पादनाची व वितरणाची परिस्थिती अत्यंत अस्वच्छ होती. खुशी ट्रेडिंग कंपनी डी मार्टकडून एक्सपायर व एक्सपायरी जवळ आलेला माल मोठ्या प्रमाणावर खरेदी करत तोच माल पुन्हा रिपॅकिंग करून नव्याने बाजारात विक्रीसाठी आणत होती, असा प्रकार समोर आला.

२२ मे २०२५ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी अभिनंदन रांदिवे यांनी खुशी ट्रेडिंगला अन्न व्यवसाय थांबविण्याचा आदेश दिला. मात्र २९ मे रोजी सहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी रांदिवे यांनी घेतलेल्या अनपेक्षित पुनःतपासणीत, आस्थापनाने परस्पर व्यवसाय पुन्हा सुरू केल्याचे आढळून आले. खुशी ट्रेडिंग कंपनीविरोधात पुढील कायदेशीर कलमान्वये घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीए पथकाने नवी मुंबई व भिवंडी येथील डी मार्टच्या शाखांवर ३० मे रोजी छापे टाकले. कारवाईदरम्यान डी मार्ट त्यांच्या स्टोअर्समधील एक्सपायर व एक्सपायरीजवळ आलेला माल खुशी ट्रेडिंगसारख्या आस्थापनांना विकत असल्याचे स्पष्ट झाले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video