गणेशोत्सवाची लगबग! गिरगाव चौपाटीवर वाॅटरप्रूफ व्हीआयपी मंडप प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

गणेशोत्सवाची लगबग! गिरगाव चौपाटीवर वाॅटरप्रूफ व्हीआयपी मंडप

१४ सप्टेंबर रोजी लाडक्या गणराचे आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई महापालिकाही बाप्पाचे स्वागत आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे.

Swapnil S

मुंबई : १४ सप्टेंबर रोजी लाडक्या गणराचे आगमन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबई महापालिकाही बाप्पाचे स्वागत आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाली आहे.

गणेश विसर्जनादरम्यान गिरगाव चौपाटीवरील व्यवस्था अधिक सक्षम आणि नियोजनबद्ध करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी येथे व्हीआयपी, विविध देशांच्या कॉन्स्युलेटमधील प्रतिनिधी आणि मान्यवरांसाठी विशेष आसन व्यवस्थेसह वॉटरप्रूफ शामियाना उभारण्यात येणार आहे.

माइल्ड स्टील स्ट्रक्चरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या मंडपामध्ये फर्निचर, व्हॅनिटी व्हॅन, स्नॅक्सची व्यवस्था तसेच आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

तसेच विसर्जन व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या माइल्ड स्टील प्लेट्सची वाहतूक, टाकणे आणि काढणे यासाठीही स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. अंदाजे ५०० स्टील प्लेट्स मरोळ यार्ड किंवा वेरावली हिल रिझर्व्हायर येथून गिरगाव चौपाटीपर्यंत आणून पुन्हा परत नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कुलाब्याहून नवी मुंबई विमानतळ १६ मिनिटांत! बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

तारापोरवाला मत्स्यालयाचा होणार कायापालट; ९०० कोटींचा प्रकल्प; ३८,००० मासे व स्कुबा डायव्हिंग; ऑक्टोबरमध्ये भूमिपूजनाची शक्यता

सरसकट कर्जमाफीवर शिक्कामोर्तब; २०१९ च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना नियमित लाभ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

एसटीच्या २१३ जागांच्या विकासाला 'हिरवा कंदील'; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

FIFA World Cup 2026 : पाऊले चालती अंतिम फेरीची वाट...; दुसऱ्या उपांत्य सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर केनच्या इंग्लंडचे आव्हान