Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात X (mybmc)
मुंबई

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएल आर) प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्पा ३-ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामाला वेग आला असून, बोगदा खनन संयंत्र (टीबीएम) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Swapnil S

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (जीएमएल आर) प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्पा ३-ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामाला वेग आला असून, बोगदा खनन संयंत्र (टीबीएम) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टीबीएम यंत्रणेची जोडणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती अभिजित बांगर यांनी दिली. या कामाची बांगर यांनी आकस्मिक पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला.

महापालिकेच्या माहितीनुसार, पहिल्या टीबीएम यंत्रणेची जोडणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच दुसऱ्या टीबीएमची जोडणीही समांतरपणे वेगाने सुरू असून दोन्ही यंत्रणा नियोजित वेळेत कार्यान्वित करण्यावर भर दिला जात आहे.

पहिल्या टीबीएमची उभारणी पूर्ण झाल्यानंतर तिची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व यंत्रणांचे समन्वित कार्य तपासण्यासाठी ‘साइट अॅक्सेप्टन्स टेस्ट’ घेण्यात येणार आहे. या चाचण्यांमध्ये यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक, नियंत्रण आणि सुरक्षा प्रणालींची कसून तपासणी केली जाईल. सर्व निकषांनुसार चाचण्या यशस्वी ठरल्यानंतर प्रत्यक्ष बोगदा खोदकामास सुरुवात होणार आहे.

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीपासून मुलुंडमधील खिंडीपाडा परिसरापर्यंत जुळे भूमिगत बोगदे बांधण्यात येणार आहेत. एकमेकांना समांतर असलेल्या या बोगद्यांची लांबी प्रत्येकी ४.७० किलोमीटर असून त्यांचा व्यास १४.२० मीटर आहे. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात बोगद्यांचा व्यास १३ मीटर ठेवण्यात आला आहे.

ऑक्टोबर २०२८ पूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट!

महापालिकेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार दोन्ही बोगद्यांचे खोदकाम सुरू करून ऑक्टोबर २०२८ पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच संपूर्ण जीएमएलआर प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जलद व सुलभ जोडणी देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचण्यास मदत होणार आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन