मुंबई

छोट्या खासगी रुग्णालयांच्या अपुऱ्या व्यवस्थेचे खापर सरकारी रुग्णालयांवर ;सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी

स्वप्नील मिश्रा

मुंबई : कळवा, छत्रपती संभाजी नगर, नांदेड येथील सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरले. सरकारी रुग्णालयांना या मृत्यूला जबाबदार धरून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली, पण राज्यातील गल्लीबोळात पसरलेल्या छोट्या खासगी रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळेच ही अवस्था ओढवली आहे. रुग्णांना आवश्यक सुविधा पुरवण्यात खासगी रुग्णालये कमी पडत असल्याने अत्यवस्थ रुग्णांना सरकारी रुग्णालयात हलवले जाते. तेथे त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे खापर सरकारी रुग्णालयांवर फोडले जाते. त्यामुळे छोट्या खासगी रुग्णालयांच्या व्यवस्थेमध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.

मेडिको लीगल सोसायटी ऑफ इंडियाने संपूर्ण राज्यातील छोट्या रुग्णालयातील सुविधांचा अभ्यास केला. या रुग्णालयांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, अत्याधुनिक उपकरणे आढळली. ६ ऑक्टोबर सरकारी वकिलांनी राज्य सरकारच्या रुग्णालयात झालेले मृत्यू हे खासगी रुग्णालयांनी आणीबाणीच्या परिस्थितीत पाठवल्याने झाले आहेत. त्यानंतर मेडिको लीगल सोसायटी ऑफ इंडियाने राज्यात सर्व्हेक्षण केले. राज्यात लहान व मध्यम आकाराच्या २०० रुग्णालयांचा सर्व्हे केला. या खासगी रुग्णालयातील अत्यंत वाईट परिस्थितीची माहिती यातून उघड झाली. सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर या खासगी रुग्णालयांची परिस्थिती बदलू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयात अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरे डॉक्टर, अपुरी यंत्रणा त्यामुळे रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याचा निष्कर्षही या संस्थेने काढला आहे.

मेडिको लीगल सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. राजीव जोशी म्हणाले की, छोट्या रुग्णालयात गंभीर रुग्णांवर कसे उपचार केले जातात हे पाहणे या सर्वेक्षणाचा उद्देश होता. छोट्या खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी बदल करण्याची सूचना सरकारला केली जाईल.

नाव न छापण्याच्या अटीवर आरोग्य विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नाकारता येत नाहीत. कारण या खासगी रुग्णालयांचे सत्य उघड होत आहे. त्यांना रुग्णांच्या आरोग्याची काळजी नाही. त्यांना केवळ पैशाची काळजी आहे. मृत्यूच्या घटना दरवर्षी घडतात, पण बाहेर येत नाहीत. खासगी रुग्णालयांचा कारभार सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. काही बडी असामी किंवा राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने खासगी रुग्णालयांवर कारवाई होत नाही, असे हा अधिकारी म्हणाला.

मर्यादा उघड

छोट्या खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा नसते. कारण चांगल्या पायाभूत सुविधा उभारायला आर्थिक मदत लागते. तसेच छोट्या रुग्णालयांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग नसतो. ही छोटी रुग्णालये चालणारे नवरा-बायको केवळ तज्ज्ञ असतात. तसेच मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून लहान रुग्णालये कोणताही धोका पत्करायला तयार होत नाहीत. तसेच या डॉक्टरांच्या मनात अटकेची भीती असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

होर्डिंगवरून तू तू-मैं मैं; बेजबाबदारपणाचे १४ बळी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू

शरद पवार, ठाकरे यांना सहानुभूती; वळसे पाटील यांचे वक्तव्य, भुजबळांचाही दुजोरा

गाझात माजी भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू

गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन